छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील १२ शालेय विद्यार्थिनींचे बालविवाह रोखण्यात आले आहेत. विविध माध्यमांतून मिळालेल्या माहितीमुळे चाइल्ड लाइन आणि महिला बालविकासच्या मदतीने हे विवाह थांबविण्यात आले

. आता याच अनुषंगाने अधिक जनजागृतीसाठी शाळा सुरू होताच शिक्षण विभागाच्या वतीने पालक समपुदेशन आणि विद्यार्थी सक्षमीकरण सुरु करण्यात येणार आहे.बालविवाह रोखण्यासाठी कायदे आहेत.तरीदेखील छुप्या पद्धतीने बालविवाह केले जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी आदेशही शिक्षण विभाग पालक समुपदेशन; विद्यार्थी सक्षमीकरणावर देणार भर देण्यात आले होते. तसेच चाइल्ड लाइन आणि दामिनी पथकचा नंबर गुणपत्रिकावर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री, कन्नड या ठिकाणी वर्गमैत्रिणींनी दिलेल्या माहितीमुळे चाइल्ड लाइन आणि महिला बालविकास यांच्या सहकार्याने जिल्ह्यात १२ शालेय विद्यार्थिनींचे बालविवाह थांबविण्यात यंत्रणेला यश आले. आता संबंधितांच्या समुपदेशनावर भर दिला जाणार आहे