बनावट अकृषक परवान्यांची चौकशी करा; आयुक्तांची मागणी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एएमआरडीए) च्या हद्दीच्या विकास आराखड्यात छेडछाड करून एन-ए च्या (अकृषक परवानगी) परवानगी देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड हे प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त असतांना त्यांनीच स्वतः या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नगरविकास संचालकांकडे पत्राद्वारे केल्यामुळे प्राधिकरणासह महसूल विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींचा गठ्ठा थेट नगरविकास खात्याकडे पाठविल्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. महसूलचे सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी असताना बोगस एन-ए च्या रॅकेटवर ते कारवाई करू शकतात. परंतु नगरविकास संचालकांना पत्र दिल्यामुळे यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत.