छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) :फुलंब्री सिल्लोड महामार्गावरील मानमोडी परिसरात विनापरवाना सतरा म्हशी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक चालकावर महामार्ग सुरक्षा पथक पोलिसांनी कारवाई केली आहे. यात म्हशीसह सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी शनिवारी (दि.२५) जप्त केला. याप्रकरणी शेख सदम शेख कुरेशी, शेख अल्ताफ शेख माजिद, शेख लियाज कुरेशी, (रा. मध्य प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ाहामार्गावरून आयशर ट्रकमध्ये सतरा म्हशी दाटीवाटीने भरून घेऊन जात होता. त्यावेळी पोलिसांनी वाहन थांबविले. तपासणीत ते विनापरवाना वाहतूक करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आयशर फुलंब्री पोलीस ठाण्यात आणला.
जनावरांना क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार सहाय्यक फौजदार रामदास वाघ यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला