फुलंब्री ; { फुलंब्री प्रतिनिधी हेमंत वाघ } छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वडोद बाजार येथे शनिवार रोजी लोकनेत्या , फुलंब्री आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व ग्रंथ तुला व हळदी कुंकवाचा कार्यक्रम वडोद बाजारचे उपसरपंच डॉ गोपाल पा. वाघ मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी वडोद बाजार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती मा. आ. अनुराधाताई चव्हाण (आ. फुलंब्री मतदारसंघ), श्रीमती डॉ. रश्मीताई बोरीकर (सहचिटणीस श्री स. भु. शिक्षण संस्था छत्रपती संभाजी नगर),यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे , राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सांडू अण्णा जाधव (भाजपा तालुकाध्यक्ष फुलंब्री), डॉ.गोपाल पा. वाघ (भाजपा तालुका सरचिटणीस फुलंब्री तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री स. भु. प्रशाला वडोद), माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुताई वाघ ,पाकीजा साबीर पठाण (सरपंच वडोद बाजार) तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ पालक ग्रामपंचायत सदस्य, सचिव, विविध कार्यकारी सोसायटीतील मान्यवर, पोलीस पाटील व्यासपीठावर हजर होते. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, नागरिक, महिलांची प्रचंड उपस्थिती या कार्यक्रमाला होती. प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती मा.आ. अनुराधाताई चव्हाण यांचा डॉ.गोपाल वाघ मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी वडोद बाजार यांच्यातर्फे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्रीमती डॉ.रश्मीताई बोरीकर, आमदार अनुराधाताई चव्हाण तसेच सन्माननीय अतिथींचे देखील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीं मा.आ. अनुराधाताई चव्हाण यांचा भव्य ग्रंथ तुला करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच डॉ. गोपाल पा. वाघ यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती लोकनेत्या, आ.सौ अनुराधाताई चव्हाण यांनीआपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले की,एकविसावे शतक विज्ञानाचे तंत्रज्ञानाचे असून विद्यार्थ्यांनी मोबाईल व तंत्रज्ञानाचा सुयोग्य पद्धतीने वापर करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा मानसीक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, विकास घडवून येईल. गुगल व्हाट्सअप, instagram, facebook अशी अनेक ॲप आहेत त्यातून विद्यार्थ्यांना जगाचा अभ्यास करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून विविध प्रकारची पुस्तके वाचनामध्ये रुची वाढवावी, पुस्तके वाचली की मस्तिष्क सशक्त होते आणि सशक्त मस्तके कोणापुढे नतमस्तक होत नसतात. जेणेकरून समाजाचा, गावाचा, देशाचा विकास होऊन एक सुसंस्कृत पिढी निर्माण व्हायला मदत होईल कारण विद्यार्थी हेच खरे उद्याचे भारताचे भविष्य आहे. असे मार्गदर्शन फुलंब्री मतदार संघाचे मा. आ. अनुराधाताई चव्हाण यांनी श्री स. भु. प्रशाला वडोद बाजार येथील व परिसरातील विद्यार्थ्यांना उद्देशून केले. श्री स. भु. प्रशाला वडोद बाजार शाखेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मा. आ. अनुराधाताई चव्हाण व श्रीमती डॉ. रश्मीताई बोरीकर यांच्यातर्फे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गणेशसिंग गौर सर व शालेय समितीचे अध्यक्ष तथा वडोद बाजार येथे उपसरपंच डॉ. गोपाल वाघ यांचे अभिनंदन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हळदी कुंकवाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील महिला मंडळांचा या कार्यक्रमात मोठा सहभाग दिसून आला. यामध्ये सर्व माता-भगिनींना मा.आ. अनुराधाताई चव्हाण यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा व भेटवस्तू देऊन सर्व माता-भगिनींचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री गणेशसिंग गौर सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस के खेडकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातून आलेले पालक ग्रामपंचायत सरपंच महिला पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
