छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ साठी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशासाठी आयोजित लेटरल प्रवेश निवड चाचणीसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. आता उमेदवार १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नवोदय विद्यालयात इयत्ता नववी आणि अकरावीच्या रिक्त जागांसाठी निवड चाचणीद्वारे ऑनलाइन नोंदणी चालू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आता १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे

. उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करत असलेल्या जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने शैक्षणिक सत्र २०२४-२५ दरम्यान जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १ मे २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान जन्मलेले उमेदवार वर्ग नववीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. तर अकरावीसाठी उमेदवाराचा जन्म १ जून २००८ ते ३१ जुलै २०१० दरम्यान झालेला असावा. दोन्ही इयत्तांसाठी भारतात शिक्षण घेणाऱ्या भारतीय नागरिकांकडूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.