विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संकल्प संपूर्ण स्वास्थ कार्यक्रम उपयुक्त-अनिल साबळे

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संकल्प संपूर्ण स्वास्थ कार्यक्रम उपयुक्त-अनिल साबळे

त्रपती संभाजीनगर : (प्रतिनिधी) भारतीय बालरोग अकादमी व शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करारानुसार संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा व सुरुवात आज दिनांक १० जुलै २०२४ रोजी महानगर पालिकेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा प्रियदर्शनी, मयुरबन कॉलनी या शाळेत करण्यात आली. उर्वरित नऊ केंद्रीय शाळांवर हा कार्यक्रम शहरातील नामवंत बालरोग तज्ञांच्या सहाय्याने दि११ जुलै २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागतगीताने करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत आपल्या प्रास्ताविकातून विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी व्यक्त केले. यावेळी मनपा उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांनी या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. असे मत व्यक्त केले.

या कार्यशाळेमध्ये डॉ. प्रभा खैरे विभाग प्रमुख बालरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी संतुलित आहार व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्व अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थी तसेच पालकांना पटवून दिले राज्य बालरोग संघटनेच्या सदस्य डॉ. मंजुषा शेरकर यांनी विद्यार्थ्यांना जंक फूड कोणते व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगितली. बालरोग तज्ञ डॉ. गणेश कुलकर्णी यांनी व्यायामाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच घराबाहेरील मैदानी खेळ यांचे महत्त्व रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना पटवून दिले. राष्ट्रीय बालरोग संघटनेच्या सदस्या डॉ. रेणू बोराळकर यांनी स्क्रीन टाईम किती असावा कसा असावा यावर मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी इस्कॉन च्या अन्नामृत फौउनडेशन च्या वतीने सकस खाऊ पुरविण्यात आला सदर कार्यक्रमास शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे • मुख्याध्यापक संजीव सोनार ज्ञानदेव सांगळे, अन्नामृत फौउनडेशन चे सुदर्शन पोटभरे, डॉ. सुहास रोटे, डॉ. समीर जोशी शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण उपनिरीक्षक, तसेच उपक्रम समन्वयक डॉ. सतीश सातव यांनी केले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापकसंजीव सोनार यांनी केले सदर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम नोडल अधिकारी तथा अधिव्याख्याता श्रीमती माधुरी दलाल यांनी केले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *