बीड (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन पोषण आहारामध्ये विद्याच्यौना दिल्या जाणाऱ्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या असुन ३ संचित आहार पद्धती नुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्त्व, अंडा पुलाब, तांदळाची खिचडी अशा पदायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्याथ्यांची खिचडीपासुन सुटका होणार असुन निक्षित केलेल्या पाककृती मध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेली मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी, मुगडाळ, खिचड़ी, चवळी खिबडी, मुग, शेवगा, वरण भात, तांदळाची खीर, चणा पुलाब, नाचणीचे सत्त्व, सोयाचीन पुलाव, मोड आलेले कडधान्य आदी. १५ पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे मात्र वस्तुस्थिती वेगळीच असुन सद्यस्थितीत तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहार दिला जात आहे. शालेय पोषण आहार पुरवठादार महाग वस्तुंची कमतरता दाखवून स्वस्त असणा-या मटकी, हरभरा, वाठणा, मसुर, मुगदाळ
यांचाच शाळांना पुरवठा करण्यात येत आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विद्याध्यर्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अजधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढविणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागातुन उत्पादीत भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्याव्यांच्या आहात होत असल्याने विद्याध्यर्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत असल्याचे नमूद केले आहे. मात्र जिल्ह्यातील किती शाळांमध्ये परसबाग आहे

आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यात विद्याथ्यांना प्यायला पाणी नाही आणि परसबाग कशी जगवायची असा प्रश्न शाळेतील शिक्षकांनी उपस्थित केला असुन केवळ कागदावर छान असणारी योजना वास्तवात मात्र उतरताना दिसत नाही. राज्यात एक राज्य एक गणवेश मोजनेची अंमलबजावणी २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत असून या अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आखी सर्व विद्याव्यर्थ्यांना मोफत गणवेश फुबठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन यामध्ये एक नियमित स्वरुपाचा गणवेश तर स्काऊटव गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम सुरू असुन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येत असली तरी नेमका गणवेश मिळणार कधी?? हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. गणवेशा बरोबरच मुलांना बुट आणि सॉक्स सुद्धा मिळाले नाहीत. गतवर्षी एका विद्यार्थ्यांसाठी एक बुट जोडी आणि दोन सॉक्स जोड यासाठी १७० रूपये निधी देयात आला होता. यावरुन कोणत्या दर्जाचे साहित्य मिळत असेल याची कल्पनाच र केलेली बरी.