फुलंब्री { प्रतिनिधी हेमंत वाघ} ; फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे जागतिक महिला दिन व श्री मणीरत्नेश्वर महादेव मंदिर महायज्ञ व श्री स्पटीक शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित मोफत सर्वरोग निदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन गायत्री आश्रमाचे महंत स्वामी श्री विशुध्दानंद तीर्थ यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिराचा 475 जणांनी लाभ घेतला असून यात महिलांची संख्या लक्षणीय होती. या शिबिरात तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आली. वाघोळा येथील महायज्ञाचा रविवार रोजी सांगता व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी पंचायत समिती सदस्या तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर व राजमुद्रा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक गाडेकर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, औषध विद्यान शास्त्र विभाग, बालरोग, कान, नाक, घसा इत्यादी विभागाच्या सर्व तपासण्या तसेच अत्याधुनिक सुविधा असलेली डायगोनोस्टीक व्हॅनच्या माध्यमातून रक्तांच्या संबंधित सर्व चाचण्या इ. सर्वरोग तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधी रुग्णांना वाटप करण्यात आली आहे.तर शिबिर यशस्वीतेसाठी अभिषेक गाडेकर, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, सचिन गायकवाड, विलास दानवे, परमेश्वर काकडे,निवृत्ती तरटे, रामू गायकवाड, कृष्णा गाडेकर, एमजीएमचे जनसंपर्क अधिकारी निजाम पठाण, जातेगाव आरोग्य केंद्राचे डॉ. लोंढे आदींनी सहकार्य केले.