वाघनखांवर आक्षेप म्हणजे शिवरायांच्या शौर्याचा अपमान

वाघनखांवर आक्षेप म्हणजे शिवरायांच्या शौर्याचा अपमान

सातारा (प्रतिनिधी) तंडाच्या व्हिस्टेरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं महाराष्ट्रत आणण्यात आली अहेत. ही बाघनख शिवाजी महाराजाची असल्याचा दावा राज्य सरकारद्वारे करण्यात आला आहे. मात्र, काही इतिहास तज्ज्ञांसह विरोधकांनी हांनी वा दाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज साताऱ्यातील शिवशवशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. माघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मी आज इथे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही, तर शिवरायांचा मावळा म्हणून उभा आहे. आज शेकडो मैल प्रवास करत ही बावनखं मराठी भूमीत दाखल झाली आहेत, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळेच आपल्याला या वाघनखांचे दर्शन झाले आहे. याबद्दल मी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोक आज या चापनखांवर शंका उपस्थित करत आहेत. हे आपलं दुर्दैवं आहे. छत्रपती शिवाजी महराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं येत आहेत, हे ऐकून प्रत्येकाला अभिमान वाटला आहे. परंतू काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे चांगल्या कामांना गालबोट लावायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण बाधनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, हा शिवरायांच्या शौर्याचा आणि फाक्रमाचा अपमान आहे,

अशी दाखल प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला, सुधीर मुनंगठीबार यांनी आज मलाही वाघनखं भेट दिली आहेत. खरं का मी मारलेले बरखडे अनेकदा दिसत नाहीत आणि ते बसले तर तोंड उघडून संगता येत नाही, असे ते म्हणाले, तसेच या वाघनखांचा योग्यवेळी योग्य वापर नक्की होईल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. प्रत्येक मराठी माणसांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक मराठी मनं आज सुखावली आहे. राज्यात आज जजुदोषाचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. प्रत्येक जण या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता. आता उद्यापासून प्रत्येक शिवप्रेमीना या वाघनखांचे दर्शन होणार आहे. खरं तर हे दर्शन बा वाधनखांचं नसून शिवरायांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचं होणार आहे, असेही ते म्हणाले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *