*वसुली जोमात पण एक वर्षा पासुन गावाला वायरमन नाही *

संबंधित अधिकारी फक्त वसुली याच मुद्यावर लक्ष्य देतात का अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे

फुलंब्री म. केसरी प्रतिनिधी हेमंत वाघ – फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील विद्युत महावितरण कंपनीचे वायरमन नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे वडोद बाजार येथे जवळपास 5000 लोकसंख्येचे गाव असलेले त्यामध्ये जवळपास एक वर्षापासून या गावाला वायरमन नसून एवढी मोठी लोकसंख्याच गाव आऊटसौर गजानन लहाने यांच्या भरोशावर चालत असून त्यामध्ये विद्युत महावितरण कंपनीची लाईन रामभरोसे चालत असून विद्वित महावितरण कंपनीचा पुरवठा खंडित होत असून तर मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सुरू असून कधी कधी लाईन गुल होऊन जाते मात्र बिल वसुली सक्तीची चालू असून त्यामध्ये वडोद बाजार येथील जवळपासझाले एक वर्षापासून विद्युत महावितरण कंपनीचा पर्मनंट वायरमन नसून विद्युत महावितरण कंपनी वायरमन का देत नाही सर्वकाही आऊटसौर यांच्या भरोश्यावर वर्षाभर का चालत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडला आहे तरी विद्युत महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन सनी वडोद बाजार येतील एवढे मोठे लोकसंख्येचे गाव असून वायरमन देण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *