९ जुलै रोजी माझा पक्षप्रवेश सोहळा
पुणे प्रतिनिधी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, विनायक राऊत आदी नेते यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर आता बसंत मोरे हे लवकरच बंचितची साथ सोडून शिवबंधन बांधणार असल्याची माहिती स्वतः वसंत मोरे यांनी दिली
आहे. ९ जुलै रोजी माझा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मी बंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्विकारले नाही. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होत आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडवे आव्हान देऊ, असे वसंत मोरे वांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ठाकरेसेनेने पक्षविस्ताराकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात ठाकरेसेनेचे फारसे प्राबल्य नाही. त्यामुळे मोरेच्या माध्यमातूर ठाकरे सेनेला पुण्यात एक चांगला चेहरा मिळू शकतो.

ही सदिच्छा भेट असल्याच बोलल जात असले तरी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागे पुण्यातून विधानसभेच तिकीट मिळवण्याची वसंत मोरेंची
रणनिती असू शकते. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाकडून त्यांनी लोकसभा लढवली. पण त्यांना केवळ ३२ हजार १२ मते मिळाली. त्यामुळे मोरे नाराज झाले. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचे तिकीट मिळू शकते. वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेची मागणी केल्याची माहिती आहे. आता ते ठाकर गटात प्रवेश करत विधानसभा लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.