फुलंब्री { प्रतिनिधी हेमंत वाघ }; फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली एक लाख रुपये किमतीची जप्त केलेली दारू सोमवार रोजी नष्ट करण्यात आली. मुख्यमंत्री महोदय यांचे महत्वकांक्षी योजना शंभर दिवस अंतर्गत सदर कार्यवाही करण्यात आली. पोलीस ठाणे वडोद बाजार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत दारूचे गुन्ह्यात जप्त जप्त मुद्देमाल एकूण ८५६ बॉटल किमती एक लाख नष्ट करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक राठोड, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नांगरे यांचे मार्गदर्शन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल इंगळे, पोलीस उपनिरीक्षक झिंझुर्डे, मोहरील मोरे यांचे सोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बिडकर यांच्या उपस्थितीत दारू नष्ट करण्यात आली

.