फुलंब्री ; { प्रतिनिधी हेमंत वाघ/ }; वडोद बाजार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडोदवस्ती, केंद्र वडोद बाजार येथे शुक्रवार, दि. ३ रोजी विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे, नफा तोटा कळावा. या हेतूने शालेय विद्यार्थ्यांची आनंदनगरी हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वडोद बाजार केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय पठाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेदखान पठाण, उपाध्यक्ष सादेक पठाण, सरपंच पाकीजा साबेर पठाण व उपसरपंच गोपाळ वाघ, गोविंद पांडेजी यांच्या हस्ते आनंदनगरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी विविध प्रकाराचे सुमारे ८५ स्टॉल लावले होते. या बाजारात जवळपास २५ ते ३० हजार रुपयांची उलाढाल झाली.

आगळावेगळा कार्यक्रम बघून व प्रत्यक्ष खरेदी विक्रीची अनुभूती घेऊन विद्यार्थी अगदी भारावून गेले होते. याप्रसंगी खरेदीसाठी पालकांनी व गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुहास वायकोस, अशोक शिंनगारे, शेख सलमान, अरुण वायकोस, राजीक शेख, शुभम गंगावणे, साबेरखान पठाण, डॉ. राहुल भिवसाने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे इन्स्टॉल लव्ह सरी खरेदी विक्रीचे ज्ञान मिळण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक आगळावेगळा आनंद बघायला मिळाला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय चिकटे, सहशिक्षक सर्जेराव बडक, शिक्षिका वंदना पाटील, जयश्री बोराडे, अनिता काचोळे, निकिता शिनगारे शिक्षक मुख्याध्यापक पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते