वडीगोद्री रोडवर बस, ट्रकचा भीषण अपघात ५ ठार, १४ जखमी

वडीगोद्री रोडवर बस, ट्रकचा भीषण अपघात ५ ठार, १४ जखमी

जालना : जालन्याच्या वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरुन येणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखर्मीना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ५ जण ठार झाले असून १४ जण जखमी झालेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे, बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक बसली, प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगानं येणारा आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला, बसमध्ये एकूण एकूण २४ प्रवाशी होते, यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *