लासुर स्टेशन येथे जबरी चोरी,तब्बल ५३, लाख ८५, हजार रुपयांच्या सोन्याचांदीवर चोरट्यांनी मारला डल्ला…..

लासुर स्टेशन येथे जबरी चोरी,तब्बल ५३, लाख ८५, हजार रुपयांच्या सोन्याचांदीवर चोरट्यांनी मारला डल्ला…..

लासुर स्टेशन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ प्रशासन हातबल…


लासुर स्टेशन { तालुका प्रतिनिधी..सविता पोळके} ; गंगापूर तालुक्यातील तालुक्यातील लासुर स्टेशन येथील अज्ञात चोरट्यानी तब्बल ५३ लाख ८५, हजार रुपयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख दीड लाख रुपयांच्या रकमेवर डल्ला मारल्याने परिसरात घबराट पसरली आहे दरम्यान. शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक योगेश खटाने, नजीर शेख,बिट अंमलदार तातेराव बेंद्रे व डॉग स्कॉड, फॉरेनसीक लॅब,शिल्लेगाव पोलीस,स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.लासुरगाव रोडवरील नम्रता किराणा दुकान येथील घटनास्थळी ,डॉग स्कॉडनें रेल्वे स्टेशन पर्यंत काढला चोरट्याचा मार्ग…..


दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की लासुर स्टेशन येथील गणेश अशोक कोठारी यांचे लासुरगाव रोडवर भर लोकवस्तीत नम्रता किराणा दुकान आहे १६ जानेवारीला सकाळी १० वाजेच्यानंतर ते १८ जानेवारीपर्यंत मध्यरात्री 1 वाजेच्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने कोठारी यांच्या घराच्यावर चढून स्टोर रुमची खिडकी तोडून स्टोर रुममध्ये प्रवेश केला व स्टोर रुमचा दरवाजा तोडला व जिन्याचे गेटचा कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरात ठेवलेल्या कपाटातील वस्तू ची उचकापाचक करुन त्यातील सोने, चांदी चे दागीने व रोख रक्कम असा ५३ लाख ८५,००० हजार रुपयांवर डल्ला मारला. दि ,१६ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता कोठारी कुटुंबिय शिडी येथे लग्नासाठी गेलेले होते त्यांना एका दिवसात घरी परत यायचे असल्याने त्यांनी कपाटाची चावी घरातच ठेवली होती. दि १६ तारखेला रात्री शिर्डी येथे त्यांनी मुक्काम केला व दि, १७ जानेवारीला रात्री ११.३० वाजेचे सुमारास शिडी येथून लासुरकडे निघाले व . दि, १८ जानेवारीला ररात्री १ वाजेच्या सुमारास कोठारी कुटुंबं घरी आले असता त्यांनी गेट व दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश केला त्यांना घरातील सामान अस्थाव्यस्थ पडलेले दिसलें कपाटाचा दरवाजाही उघडा होता त्यामुळे त्यांनी जिन्यातील गेट पाहीले तेव्हा गेटचा कड़ी कोंडा तुटलेला होता जिना चढून वरच्या मजल्यावर आले असता वरचा दरवाजादेखील तुटलेला दिसल्याने त्यामुळे घरात चोरी झालेली असे त्यांच्या लक्षात आले घरात कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने व रोख रक्कम याची पाहणी केली असता घरातील सोने चांदी व रोख रक्कम चोरट्यानी लांबवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले चोरी गेलेल्या वस्तूत ४,८०,०००/- रुपये कि, चे दोन सोन्याचा कानातला सेंट,सहा तोळे वजनाचे १६,०००००/- रुपये किं. चे सोन्याचा दहा बांगडया (वीस तोळे वजनाचे) ८०,०००/- रुपये कि. चे एक सोन्याची बिंदी (एक तोळा वजनाचे)८०,०००/ रुपये कि. चे एक सोन्याचे हातफुल (एक तोळा वजनाचे) ८,००००० रुपये कि व दोन सान्याचे ब्रासलेट (पाच तोळा वजनाचे)२,४०,०००/- रुपये किं. चे दोन सोन्याचे पंडल सेट (तीन तोळा बजनाचे) २,६०,०००/- रुपये किं चे पाच सोन्याचे अंगठ्या (सव्वा तीन तोळा सजताचे) ३.२०,००० रुपये किं वे डीन मीन्याचे छोटे मंगळसूत्र (चार तोळा वजनाचे)३,६०,०००/- रुपये कि. चे एक सोन्याचे मोठे मंगळसुत्र (साडे चार तोळा बजनांचे) २,४०,०००/- रुपये कि, चं पांच कानातील सोन्याचे जोड (तीन तोळा वजनाचे)२,०००००/- रुपये कि, चे एक सोन्याचे बाजुचंद (अडीच ताळा वजनाचे) १,०००००/ रुपये कि चं दोन सोन्याच सट राज गोल्ड कानातले (सच्या ताळा 4.जनार्च) ८०,०००/- रुपये कि. वे दोन लहान मुलीच्या सोन्याच्या बागडया (एक तोळा वजनाचे)१.२०,०००/- रुपये किं. चे एक सोन्याची चैन (दिड तोळा वजनाचे) ८०.०००० रुपये किं. चे चार सोन्याचे मनगट्या (एक तोळा वजनाचे)७५,०००/ रुपय किं. चे चांदीचे दागीने (७५० ग्रॅम वजनाचे) १,५०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकूण ५३ लाख ८५,००० हजार रुपयाच्या ऐवजावर चोरट्यांनी दल्ला मारला असून या चोरीच्या प्रकरणामुळे लासुर स्टेशन परिसरात घबराट पसरली आहे

:-वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनामुळे व्यापाऱ्यात नाराजी,किराणा असोसिएशननें ठेवली दुकानें बंद…..

दरम्यान लासूर स्टेशन परिसरात वारंवार घडणाऱ्या प्रकारमुळे लासूर स्टेशन शहरासह परिसरातील व्यापाऱ्यात नाराजी पसरली असून पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून चोरट्याना लगाम घालावा व व्यापारी चोरट्याच्या दहशतीत असून काही दिवसापूर्वी भरवस्तीतुन माळीवाडगांव येथील एका शेतकऱ्याच्या मका विकून आलेल्या ४ लाख रुपयावरही चोरट्यानी भरदिवसा डल्ला मारला होता तसेच छोटे मोठे चोऱ्या वारंवार होऊनहीं यांचा तपास अद्यापही लागलेला नाही त्यातच अर्ध्या कोटीचे सोने चोरी झाल्याने व्यापाऱ्यांची पाचावर धरण बसली त्यामुळे किराणा असोसिएशननें आपली व्यापारी आस्थापने व दुकानें बंद ठेवली होती.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *