लासुर : तालुका :{ प्रतिनिधी सविता पोळके }लासुर स्टेशन येथील महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील सहाय्यक अभियानत्याने विनापरवानगी देता एका खाजगी ठेकेदाराला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लाईन पोल स्थलांतर करण्यासाठी तब्बल साडेपाच तास गावठाण लाईन बंद करून मुभा दिली आहे. ज्यामुळे सावंगी परिसरातील शेकडो वीज ग्राहकांना नाहक कित्येक तास वेठीस धरण्याचा प्रकार महावितरण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंत्याकडून सुरू आहे. लासुर स्टेशन येथील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची हद्द कायम करून त्या ठिकाणी नाली काम सुरू आहे. हे काम सुरू असताना एका दुकानासमोर एक लाईन पोल उभा होता तो पोल काढण्यासाठी ज्या ठेकेदाराला नालीचे काम मिळाले आहे त्या ठेकेदाराने तो लाईन पोल काढण्यासाठी एका खाजगी ठेकेदाराला रुपये ३५ हजार इतक्या रकमेत लाईन पोल काढण्यासाठी ठेका दिला. संबंधित ठेकेदाराने रीतसर उपविभागीय कार्यालय येथे गावठाण लाईन बंद करणे लाईन पोल शिफ्ट करणे अथवा तो स्थलांतर करणे यासाठीची रीतसर परवानगी घ्यायला हवी होती परंतु असे काही न करता या संबं त ठेकेदाराने संबंधितब शाखा अधिकारी यांच्याशी संगनमत करून विना परवानगी सावंगी गावठाण तब्बल साडे पाच तास बंद केले. मुळात गावठाण लाईन बंद करायची असेल किंवा एखादा पोल स्थलांतरित करायचा असेल तर त्याची रीतसर परवानगी विभागीय कार्यालय येथून घ्यावी लागते. जर ती मंजूर झाली तर ते काम 1.3 योजनेतून म्हणजे ज्या मालकाला लाईन पोल शिफ्ट करायचा आहे किंवा स्थलांतर करायचा आहे त्याने त्याची फीस भरून ते काम करायचे असते. परंतु या ठिकणी अस न होता विना परवानगी, किंवा १.३ योजनेची कुठलीही प्रकरिया न करता विना परवानगी सावंगी गावठाण साडे पाच तास बंद करून शेकडो वीज ग्राहकांना वेठीस धरले. गावठाण लाईन का बंद केली? कुठले काम सुरू होते? जो ठेकेदार पोल स्थलांतर करत होता त्यानी रीतसर परवानगी घेतली होती का? गावठाण लाईन इतक्या वेळ बंद करतात येती का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून संगनमत करणाऱ्या अधिकारी व कुठली परवानगी नसताना लाईन पोल स्थलांतर करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होईल का असा प्रश्न वीज ग्राहक विचारात आहे.

प्रतिक्रिया :
रवींद्र भिवसेने उपविभागीय अधिकारी गंगापूर साडे पाच तास सावंगी गावठाण बंद करून शेकडो ग्राहकांना वेठीस धरले. मी या बाबत शिवाजी आहेर याला विचारून सांगतो. नंतर फोनच आला नाही. शाखा अभियंता शिवाजी आहेर.लासुर स्टेशन संबंधित शाखा अधिकारी यांना या कामाची परवानगी कोणी दिली असे विचारले असता, तुम्ही नाहक त्रास देत आहात. तुमच्यासाठीच काम सुरू आहे. असे उत्तर दिले. रामेश्वर चव्हाण संबंधित ठेकेदार : मी आणखी परवानगी घेतली नाही, पैसेही भरले नाही. उद्या परवानगी घेतो.