गंगापूर (प्रतिनिधी)- पतीपासून विभक्त राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेवर मेव्हण्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ मे रोजी २७ वर्षीय महीला फिर्यादी रा. लासुर स्टेशन ता. गंगापुर यांनी शिल्लेगाव पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या लासुर स्टेशन पोलीस चौकीत येवुन दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीचा पती हा नेहमी दारु पिण्याच्या सवईचा असल्याने फिर्यादी ही पतीपासुन मागील पाच ते सहा वर्षापासुन वेगवेगळे राहत होते

. दरम्यानच्या काळात फिर्यादी व तिचा मेव्हणा दोघे जण कांदा मार्केटमध्ये काम ाला असतांना आरोपी ज्ञानेश्वर आव्हाड रा. मांडकी ता.वैजापुर याने फिर्यादी सोबत लग्न करतो असे म्हणाला असता फिर्यादीने नकार दिल्याने आरोपीने स्वःताला ब्लेड मारुन घेवुन माझ्या जिवाचे बरे वाईट करील अशी धमकी देवुन फिर्यादीस लग्न करतो असे अश्वासन देऊन तिचेवर मागील पाच ते
सहा वर्षापासुन बळजबरीने ईच्छेविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध करुन बलात्कार केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयातील आरोपी ज्ञानेश्वर मच्छिद्र अव्हाड वय ३७ रा. मांडकी ता. वैजापुर यास दि. २७ मे रोजी गुन्हयात अटक करुण सदर आरोपीला गंगापूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि डी. एस. साखळे करित आहे.