रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावर भरधाव पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवन गौतम खिल्लारे (वय ३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सासुरवाडीत पत्नीला भेटून घरी परतत असताना शुक्रवारी मध्यरात्री १:३० वाजता हा अपघात घडला.पवन मिसारवाडीत कुटुंबासह राहत होता आणि खासगी कंपनीत नोकरी करत होता. पत्नी माहेरी गेल्यानंतर तो शुक्रवारी रात्री राहुलनगर सासुरवाडीत तिला भेटण्यासाठी गेला होता. परतताना रेल्वे स्थानक उड्डाणपुलावर दोन हजार लिटर पाणी भरलेल्या टँकरने (एमएच १६-एई-७०९६) त्याला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक सुरेश गैंगजे, अंमलदार कारभारी नलावडे, गजानन देशमुख यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पवनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डोके आणि छातीला झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरही उलटला व पुलावर पेट्रोल आणि तेल पसरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अंमलदार विकास चव्हाण, रवी गाडे, भीमराव फलटणकर, प्रवीण बोधवडे, प्रमोद कुंभार, जितेंद्र ठाकूर, प्रकाश चोपडे यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. अग्निशमन दलाच्या बंबाने तेल हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, टँकरचालक फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *