छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : माननीय श्रीमती साठे सोनिया मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सर्व शिक्षक बंधु भगिनींनीही प्रतिमा पूजन केले. काही विद्यार्थ्यांनी आपले विचार भाषणाद्वारे मांडले तर काही विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रक तयार केले. काही विद्यार्थीनी तर थेट यशस्वी महिलांच्या वेशभुशेत आले. यावेळी श्रीमती साठे मॅडम यांच्या हस्ते शाळेतील महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सेलूकर सुषमा यांनी केले. अशाप्रकारे हसत खेळत सर्वांचे सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
