रिझर्व बँक उडवून देण्याच्या धमकीने खळबळ !!

रिझर्व बँक उडवून देण्याच्या धमकीने खळबळ !!

मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाला गुरूवारी रात्री एक धमकीचा ई-मेल आला असून त्यात ई-मेल रशियातून आल्याचे भासवण्यात आले आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी रिझर्व बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर धमकीचा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तैयबाचे सीईओ असल्याचा दावा केला होता. रिझर्व बँकेचे सुरक्षा रक्षक गोपाळ चौहान यांच्या तक्रारीवरून एमआरए पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुरूवारी दुपारी आलेल्या या ई-मेलमध्ये रशियन भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यात स्फोटकांनी आरबीआय बँक उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी सर्व यंत्रणांना सतर्क केले असून ई-मेलच्या माध्यमातून गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत आहे. यापूर्वी रिझर्व बँकेला असा धमकीचा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तैयबाचे सीईओ आहे, असे सांगून अचानक फोन ठेवला. बँक बंद करा. मोटरगाडी धडक देणार आहे, अशीही आरोपीने धमकी दिली. ही धमकी गंभीरतेने घेऊन रिझर्व बँकेच्या सुरक्षा रक्षकाने माता रामाबाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानीच्या लग्नात बॉम्ब असल्याचे द्वीट करणाऱ्याला नुकतीच मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. हे टीट १३ जुलैला करण्यात आले होते. दरम्यान, सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली होती. याप्रकरणी विरल आसरा या तरूणाला अटक करण्यात आली होती. तो खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी आयटी इंजिनीअर होता. तर १३ मेला एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून असलम अली कराची पाकिस्तानमधून ३५० किलो आरडीएक्स घेऊन मुंबईत आला आहे. तो महालक्ष्मी, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानाकांवर आरडीएक्स ठेवणार असल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. तपासाअंती हा दूरध्वनी खोटा असल्याचे स्पष्ट झाले होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *