पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे याची पोलिस ठाणे सिडको एन सात येथे तक्रार
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी दि.२९/०५/२०२४ रोजी महाड येथे मनुस्मृती विरोधातील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे समस्त बहुजन समाजाच्या व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, तसेच, आंदोलनासाठी तयार करण्यात आलेले बॅनर्स हे डॉ. बाचासाहेबांचा अपमान करणारे आहे

कारण मनुस्मृती हे नांव वरती व त्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याचे बॅनरमध्ये दिसत आहे. ते आक्षेपार्ह आहे. आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड फोटो फाडत असतांना त्यांना आंदोलनातील एका व्यक्तीने थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यानी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले व फोटो फाडला. त्यामुळे त्यांनी केलेले कृत्य हे अतिशय निंदणीय व चिड आणणारे म्हणून त्यांचेवर त्यांनी केलेल्या कृत्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) च्या वतीने सिडको एन सात पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, आकाश साबळे शुभम आसलकर यांच्या सह्या आहेत.
.