छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी : सचिन भंडारे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष श्री अभिजित भैय्या देशमुख यांच्या शिफारसीने सेवापथ सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अकबर अख्तर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व स्वयंरोजगार सेल च्या शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष ना. श्री सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, रोजगार व स्वयंरोजगार सेल च्या प्रदेश अध्यक्ष सौ. मेघाताई पवार,प्रदेश सरचिटणीस डॉ. महीबुब सय्यद,तसेच अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रफिक भाई यांची उपस्थिती होती. शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त सामाजिक संस्था,एनजीओ, ऑर्गनायझेशन यांना एकत्रित करून सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असेल असे शेख अकबर भाई यांनी बोलून दाखवले, महिला व बचत गट यांच्या साठी गृह उद्योग सुरू करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त शासकीय योजना जनसामान्य पर्यंत पोहचवण्यासाठी ते कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, अन्न वाचवा समितीचे अनंत मोताळे, ॲड.जिग्यासी,पोरे, वाजपेयी, आसबे, नागेश गव्हले यांनी सुद्धा शेख अकबर यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले. या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून व विशेष म्हणजे शहर व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थे द्वारे,कामगार बांधवाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
