राज्यात देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना लगाम; महसूलमंत्र्यांचे कडक आदेश

राज्यात देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना लगाम; महसूलमंत्र्यांचे कडक आदेश

कोल्हापूर : देवस्थानच्या नावे असलेल्या जमिनींची बेकायदेशीर खरेदी-विक्री रोखण्यासाठी आता शासन अधिक गंभीर झाले आहे. यापुढे अशा जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार थांबवण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्यासाठी शासन अध्यादेश जारी केला जाणार आहे. या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुमारे ३० हजार एकर देवस्थान जमिनी आहेत. या जमिनी शेतकऱ्यांच्या कसणीत असल्या तरी त्यांची खरेदी-विक्री कायद्यानुसार करता येत नाही. तरीही काही ठिकाणी परस्पर व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दस्ताऐवज न तपासता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्यामुळे शासनाने यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. .महसूलमंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात संभाजीनगर शहरातही कार्यवाहीची गरज असल्याचे सांगितले

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *