रस्त्यासाठी युवकाचा गंगापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न !

रस्त्यासाठी युवकाचा गंगापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न !

गंगापूर (प्रतिनिधी:लक्ष्मीकांत माघाडे) गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद ते तांदुळवाडी रोडवरील अतिक्रमण व रस्त्याचे काम मागणी करुनही होत नसल्याने युवकाचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न नागरिक व पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. योगेश भानुदास दिवटे यांनी बांधकाम विभाग तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना २० डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले आहे की तुर्काबाद, राजुरा, येसगाव या रोड चे मागील सहा ते सात महिन्यापासून काम चालू असताना MDR-119 तुर्काबाद ते तांदुळवाडी रोड चेनेज न. 05/800 ते 06/100 मधील झाडाचे अतिक्रमण असल्या कारणाने 200 ते 250 मीटर रस्त्याचे काम बंद करून पुढील काम करण्यात आले हे अतिक्रमण हटवुन राहीलेले काम ३१ डिसेंबरच्या आत कारणे न सागता काम चालू करण्यात यावे अन्यथा १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्या समोर किवा तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दिवटे यांनी १ जानेवारीला दुपारी तहसील कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *