रशिया हादरले, चर्चवर दहशतवादी हल्ला, १७ पोलिसांसह अनेकांचा मृत्यू, ६ हल्लेखोरांचा खात्मा

रशिया हादरले, चर्चवर दहशतवादी हल्ला, १७ पोलिसांसह अनेकांचा मृत्यू, ६ हल्लेखोरांचा खात्मा

१७ पोलिसांसह अनेकांचा मृत्यू, ६ हल्लेखोरांचा खात्मा

मॉस्कोः रशियातील डागेस्तान प्रांतातील दोन शहरांवर – रविवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये १७ – पोलिस आणि चर्चेमधील फादर – यांच्यासह अनेकांचा दुर्दैवी मृत्यू – झाला. तर २५ हून अधिक – लोक जखमी झाले आहेत. – या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना – केलेल्या कारवाईत रशियन सैनिकांनी ६ दहशतवाद्यांचा – खात्मा केला आहे. रशियातील डागेस्तान भागात सैन्याचे – ऑपरेशन अद्याप सुरू आहे. – एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या हल्ल्यामुळे – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रशियातील रस्त्यांवर – टँक आणि स्पेशल फोर्स तैनात – करण्यात आले असून गेल्या ९ तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात अधिकारी, एक धर्मगुरू आणि एका चर्चच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे.

दागेस्तानमधील डबँट आणि मखाचकला या दोन शहरांमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे शोक दिवस घोषित करण्यात आले आहेत. रशियामध्ये हल्लेखोरांकडून एकाच वेळी दोन अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात डर्बेट आणि मखचकाला शहरीत चर्चचा तसेच पोलिस स्टेशनचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी चर्चमध्ये ऑटोमॅटिक शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केला. एवढंच नव्हे तर दहशतवाद्यांनी डर्बे टमधील फादर निकोले यांची देखील हत्या केली. क्रूरकर्मा दहशतवाद्यांनी त्यांचा थेट गळा कापला. मखचकला आणि डबैं टमध्ये प्रार्थना सभांवर हल्ला करण्यात आला. तसेच डर्बेटमध्ये प्रार्थना सभेत आग लावण्यात आल्याने तो भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाचीही हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ऑपरेशन लाँच करण्यात आले असून यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *