गंगापूर (प्रतिनिधी) : सध्या भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत सुरू असून काल संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या मंडळ अध्यक्षांची निवडीची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत गंगापूर तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल करून संघटनात्मक रचना मजबूत करण्याच्या दृष्टीने एका तालुक्यात दोन तालुकाध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात घेतला आहे. त्यानुसार रवींद्र चव्हाण तसेच सुरेश शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष असतील. गंगापूर तालुक्यामध्ये आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली मेहनत व सर्व सामान्यांच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची नेहमी असलेली धडपड यामुळे ते जनसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

त्यांच्या फेरनिवडीबाबत आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर जी धनायत तसेच गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव, दादासाहेब पाटील तायडे सुरेश भाऊ जाधव अनिल पाटील चव्हाण सुनील पाखरे , अमोल पाटील जाधव, लासूरच्या सरपंच मीनाताई संजय पांडव यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.