छत्रपती संभाजीनगर ; { प्रतिनिधी डॉ सचिन साबळे } छत्रपती संभाजीनगर भारतीय उद्योगजगताचे ज्येष्ठ कर्मी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष श्री. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले
आहे. भाजपाचे प्रवक्ता म्हणून ते बोलत होते. रतन टाटा यांचे भारतीय उद्योग, शिक्षण आणि सामाजिक सेवांमध्ये दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोठा वाटा उचलणाऱ्या रतन टाटा यांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी भारतरत्न देणे उचित ठरेल, असे गोरखे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, रतन टाटा यांच्या उद्योगधंद्यातील यशाबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही ते सर्वांसाठी प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांचे शांत, संयमी आणि दूरदृष्टीने चाललेले कार्य सदैव देशासाठी मोलाचे राहील.