रक्तदान महायज्ञात ८० भाविकांनी केले रक्तदान:जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा उपक्रम
फुलंब्री { प्रतिनिधी हेमंत वाघ } }फुलंब्री : जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक महारक्तदान शिबिराचे शुक्रवार (दि.१७) रोजी आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या करण्यात आले. यावेळी श्री. बलांडे यांनी सांगितले की,रक्तदान हेच श्रेष्ठ दान, सामाजिक गरज तसेच रक्तपेढ्यांना रक्ताच्या बाटल्या देण्याचा संकल्प करण्यात आला.अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे मानवतेच्या सेवेचा संदेश रुजतो, आणि “रक्तदान हेच महादान” ही भावना अधिक दृढ होते. या महान यज्ञामध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानत, आयोजकांच्या कार्याला सलाम केला.असे श्री. बलांडे यांनी कौतुक केले.फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे आयोजित रक्तदान शिबिरात प्रतिसाद देत ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले

. संजीवनी ब्लड बँक बँकेचे या शिबिराला सहकार्य मिळाले. या शिबिराला सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. रक्ताचा तुटवडा भासू नये, गरजू रुग्णांना उपचारादरम्यान रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरे भरवली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक विभागात हे शिबीर घेण्यात आले. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या शिबिरासाठी संस्थेचे कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.यावेळी या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक योगेश जाधव,योगेश शिरसाठ,संजीवनी ब्लड बँकेचे संचालक नितीन लोखंडे, नागेश कुंजरवाड तालुका कमिटीचे राजु बनकर, दादाराव, इधाटे, आडगाव सेवा केंद्राचे विलास भूमे, पवन वैष्णव, दिपक काळे, मा. सरपंच शाईनाथ भूमे,शुभम जगताप, ज्ञानेश्वर भूमे,धोंडिबा गवरे,विजय महाराज भूमे,योगेश चव्हाण,योगेश धोंडकर, कचरू भूमे,आदी गांवकरी व भाविक उपस्थित होते.