लेबनॉन : हिजबुल्लाहने हल्ला चढवल्यानंतर इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी इस्त्रायलच्या सैन्यांनी लेबनॉनमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. जवळपास १०० लढाऊ विमानांनी, जेट फायटरने सीमावर्ती भागात जोरदार हल्ला केला. इराण समर्थित हिजबुल्लाह ही संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती. हिजबुल्लाहने लेबनॉनच्या धरतीवरुन इस्त्रायलवर ३२० पेक्षा अधिक कत्युशा क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. वरिष्ठ कमांडर फहाद शुक्र याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा हिजबुल्लाहने केला होता. दोन आघाड्यांवर इस्त्रायल रविवारी सकाळी इस्त्रायलवर हल्ला केल्याची पुष्टी लेबनॉनच्या हिजबुल्लाहने केली. बैरुत येथे त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलवर हल्ला चढवल्याचा दावा त्यांनी केला. बैरूत येथील दक्षिणेतील एका उपनगरात हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी फवाद शुक्र हा ठार झाला होता. त्यानंतरहिजुबल्लाहने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. ४८ तासांची आणीबाणी
हिजबुल्लाहविरोधात आक्रमक होत इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी पुढील ४८ तासांसाठी आणीबाणी घोषीत केली आहे. तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उत्तरेतील या धुमश्चक्रीबाबत माहिती देण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

जो आमचे नुकसान करेल, आम्ही त्याचे नुकसान करु, त्याला करारा जवाब देऊ असे नेतन्याहू यांनी या बैठकीत स्पष्ट केले. ढळाशी जष खीॲरशन च्या वृत्तात यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी लक्ष्याचा अचूक भेद केल्याचा दावा करण्यात आला आहे. हिजबुल्लाह रॉकेट लाँचर बॅरलवर हल्ला चढवला होता. त्यात ते सर्व नष्ट झाल्याचा दावा इस्त्रायलच्या लष्कराने केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या लेबनॉनमधील ४० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.