छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी ) : उस्मानपुरा परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मोबाईल गेममध्ये हरल्यानंतर मावस भावानेच चाकूने वार करून भावाची हत्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचे नाव जाहीर करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मारेकरी अल्पवयीन मावस भावाला सज्ञान समजावे यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप निपटे (१९, रा. पिंपरखेड ता. वडवणी, जि. बीड) हा अमर शिंदे, अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण आणि अल्पवयीन मावस भाऊ याच्यासोबत उस्मानपुरा भागातील म्हाडा कॉलनीत एका फ्लॅटमध्ये राहत होता. प्रदीप आणि त्याचा अल्पवयीन भावस भाऊ दोघेही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले होते. गेममध्ये जिंकलेल्या पैशातून दोघांमध्ये अनेकवेळा वादही झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून सोबतच राहत होते. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी (दि.१४) पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. अल्पवयीन मावस भावाने प्रदीपकडे त्याने ऑनलाईन गेमिंग जुगारात हरलेल्या पैशाची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये झटापट होऊन वाद झाला.अल्पवयीन मावस भावाने रूमवर कोणी नसल्याचे पाहून थेट चाकूने प्रदीपची निघृण हत्या केली. मृतदेह चादरीने झाकला. रक्ताने माखलेले कपडे बदलले. त्याचा मोबाईल घेऊन पतंग उडवायला जातोय, असे सांगून निधून गेला. मात्र काही वेळाने प्रदीपच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी रूमवर तो परत येऊन गेला. त्यानंतर बचावारी त्याने अत्यंत शांत डोक्याने प्लनिंध केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास निरीक्षक अतुल बेरमे करत आहेत.

६५ हजारांसाठी हत्या…
प्रदीप आणि त्याचा अल्पवयीन मावस भाऊ दोघेही प्रदीपच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होते. भावस भाऊ गेम खेळण्यात पटाईत होता. गेममधून त्याने १ लाख रुपये विकले होते. प्रदीपही ऑनलाईन गेम खेळत होता. १ लाख रुपयांमधील ६५ हजार रुपये हरला होता. त्यामुळे दोघांमध्ये त्या पैशावरून वाद सुरू होता. खुनाच्या दिवशीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास रागाच्या भरात चाकूने वार करून त्याची हत्या केली. या झटापटीत्या अल्पवयीन मावस भावालाही जखम झाल्याची माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.