वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावखेड खंडाळा येथे एका मोकळ्या शेतात महिलेवर बलात्कार केल्याची घटना (दि.२०) जून रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सावखेड खंडाळा ही पिडीत महिला घरी झोपलेली असताना संदीप गायके रा. आचलगाव हा तिच्या घरी आला

. या पिडीत महिलेला त्याने झोपेतून उठवून तिच्या मोकळ्या शेतातघेऊन गेला व म्हणाला की, मी तुझे माझ्या मोबाईलमध्ये नग्ण फोटो काढलेले आहेत. ते मी लोकांना दाखवुन तुझी बदनामी करेल अशी धमकी देऊन बळजबरीने पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला. याप्रकरणी शिऊर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी या करत आहे.