छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी सचिन भंडारे) : घरासमोरील कंपाऊंडमध्ये बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलींची छेड काढत घरावर हल्ला केल्याचा प्रकार हडको एन १२ विवेकानंद नगरात घडला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत शंकरलाल जैस्वाल रा. स्वामी विवेकानंद गोदावरी शाळेजवळ हडको एन १२ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार १४ जानेवारी रोजी फिर्यादींच्या मुली घराच्या कंपाउंड मध्ये बॅडमिंटन खेळत असताना तेथे तीन अनोळखी आरोपी दारू पिऊन आले. स्कुटी घराबाहेर उभी करत फिर्यादीच्या कंपाउंडबाहेर उभे राहून मुलींना शिवीगाळ केली. कंपाऊंडच्या गेटला लाथा मारल्या. फिर्यादी घराबाहेर येत आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी कंपाउंडमध्ये घूसत फिर्यादींना मारहाण केली. या प्रकरणी सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत
