छत्रपती संभाजीनगर: { प्रतिनिधी हेमंत वाघ } मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा, सरकार व प्रशासनाने बजरंग त्यांच्यावर गुन्हा घोषणांनी दाखल करावा. या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने सिडकोतील बजरंग चौकात मंगळवारी (दि.११) जोरदार निदर्शने करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना परळीत घडली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाले आहे, मात्र आरोपींना अभय देणारा, ताकद देणारा धनंजय मुंडे आहे, त्याच्यावर खऱ्या अर्थाने गुन्हा चौक दणाणला दाखल झाला पाहिजे, मुंडेंनी सत्तेचा, मंत्रीपदाचा गैरवापर केलेला आहे. मुंडेंची प्रचंड दशहत जिल्ह्यात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे जेलमध्ये गेला पाहिजे., तरच भयमुक्त बीड होईल, परळी होईल, असे प्रा. माणिकराव शिंदे पाटील म्हणाले

. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत कदम, गणेश वडकर, रघुनाथ शिंदे, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, कल्पना चव्हाण, संजय गायके, सुनीता पाटील, राहुल मते, नरहरी गोरे, दिपक नारळे, अशोक वाघ, भागवत काकडे, विद्या मोहिते, जयश्री दाभाडे, प्राप्ती चव्हाण, रेखा थिटे, संतोष कुशेकर, विक्रम जिवरग, ऋषिकेश स साठे, सुनीता मेटे, तुकाराम बारबैले, संजय काकडे, गणेश शेळके, शोभा जाधव, लता कासार, आकाश वनारशे, संदीप चव्हाण, दत्तात्रय मोगल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.