छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीसह मित्राला मारहाण केल्याची घटना लेबर कॉलनी परिसरात मंगळवारी घडली होती. या प्रकरणी जखमी तरुणाच्या तक्रारीवरून अज्ञात १५ ते २० आरोपींवर सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. | आकाश सुनील शिंदे (वय १९) रा.देवगाव फाटा येवला जि. नाशिक यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी मैत्रिणी सोबत बोलत असताना मोटरसायकलवर आलेल्या चार अनोळखी इसमानी त्यांना अडवले. फिर्यादीला नाव विचारले असता आणि आकाश सांगितले. त्यावर आरोपींनी ये बुरखे मे लडकी है वो तुम्हारी कौन है, असे विचारले. त्यावर फिर्यादीने ती माझी मैत्रीण आहे असे म्हणताच लोक फिर्यादीला मारहाण करू लागले. देखो देखो ये छोकरा अपनी बच्ची को भगाके ले जा रहा है असे म्हणत आरडाओरड करू लागले. फिर्यादीने आरोपींना समजावून सांगितले असता जमावाने काहीही ऐकून घेतले नाही. आजूबाजूच्या लोकांना बोलवत दोघांनाही लेबर कॉलनी येथील मोकळ्या जागेत घेऊन गेले व जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या तोंडावर डोक्यात व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कदम हे पुढील तपास करीत आहेत.

तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा
दरम्यान या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश सुनील शिंदे व एक अनोळखी इसम यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी दिलेल्या फिर्यादीनुसार ती आरोपीशी बोलत असताना त्याने फिर्यादीच्या गळ्यात हात टाकला. त्यामुळे फिर्यादी आरोपीस म्हणाली की तू असे करू नको, तू यानंतर फोन करत जाऊ नको, तू यानंतर भेटू नको असे सांगत असताना मोटरसायकलवर आलेल्या चार अनोळखी मुलांनी इतर अनोळखी लोकांच्या जमावाने फिर्यादी व आरोपीला मारहाण केली.