मानधनाच्या अन्यायातून आत्मदहनाचा टोकाचा निर्णय – आयसीआरपी कर्मचाऱ्याला उपचारासाठीही नाही पैसा !

मानधनाच्या अन्यायातून आत्मदहनाचा टोकाचा निर्णय – आयसीआरपी कर्मचाऱ्याला उपचारासाठीही नाही पैसा !

छत्रपती संभाजीनगर : २८ महिन्यांपासून मानधन थकवल्याने संतापलेल्या आयसीआरपी कर्मचाऱ्याने स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करून प्रशासनाला जाग आणली. हा धक्कादायक प्रकार कोळवाडी (ता. कन्नड) येथील रंजना जयराम काळे यांच्या बाबतीत घडला. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून मार्च २०२२ ते जुलै २०२४ या कालावधीतील मानधन मिळालेले नाही. यासाठी काळे यांनी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय अशा सर्व स्तरावर वारंवार अर्ज केले. सलग पाच दिवस उपोषण करूनही काहीच निष्पन्न झाले नाही. यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या काळे यांनी ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी घटनास्थळी धावत पोहोचले आणि त्यांनी काळे यांचे प्राण वाचवले. त्याचवेळी त्यांनी योग्य चौकशी करून थकबाकी मानधन नक्की दिले जाईल असे आश्वासनही दिले. या घटनेत काळे यांना दुखापत झाली असून त्या सध्या उपचार घेत आहेत. परंतु सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे – उपचारासाठी आवश्यक पैसा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. काम करूनही वेतन न मिळाल्याने आणि आता वैद्यकीय खर्च उचलता न आल्याने त्या दुहेरी संकटात सापडल्या आहेत. “आर्थिक गैरव्यवहार झाकण्यासाठी आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत, आमच्या ग्राम संघाला मुद्दाम सभांतून वगळले जात आहे. चौकशी समितीसमोर २८ महिन्यांचे मानधन देण्याचे आश्वासन दिले गेले होते, पण अजूनही काहीच झालेले नाही,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *