छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने रमाई स्मारक समितीच्या वतीने गोपाल टी पॉईंट येथे माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.माता रमाई यांचे निधन मुंबईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न बांधलेल्या राजगृह बंगल्या झाले. त्यामुळे रमाईची सुरुवात जरी गरीबीतून – झाली असेल परंतु शेवट हा गरिबीत नव्हता. त्यांनी जे काही कष्ट घेतले ते – समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी घेतले होते.

त्यामुळे आजच्या तरुणांनी गरिबीला झटकून नैतिक मार्गाने पैसे कमावले पाहिजेत आणि न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा. असे प्रतिपादन सिद्धार्थ शिनगारे यांनी केले. याप्रसंगी पंकज बनसोडे, प्रथम कांबळे, राहुल मकासरे, आशुतोष नरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमात आभार नितीन साळवे यांनी मानले. या कार्यक्रमास नीकेत रेडे, अॅड. नावकर, आदित्य वडमारे, अजय नाडे, आकाश कोलते, रोहित खरे, बंडू, मयूर, रितेश गंगावणे, सुमित वेलदोडेसह समितीचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.