माजी सैनिकाची दादागिरी! अतिक्रमण विभागाच्या छत्रछायेखाली फळविक्रेत्यावर अन्याय !

माजी सैनिकाची दादागिरी! अतिक्रमण विभागाच्या छत्रछायेखाली फळविक्रेत्यावर अन्याय !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात एका गरीब फळविक्रेत्यावर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कारवाई करत हातगाडी जप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ एप्रिल रोजी (रविवार) शेख कलिम शेख हनीफ (वय ५७) हे त्यांची हातगाडी लावून फळविक्री करत असताना, म.न.पा. अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही नोटीस अथवा पावती न देता त्यांची हातगाडी उचलून नेली. गाडीत फळांचा माल, मोजमापाचा काटा आणि सुमारे १२०० रुपये रोख रक्कम होती, जी सुद्धा परत करण्यात आलेली नाही. सदर कारवाई करताना अतिक्रमण विभागातील प्रमोद जाधव, जे स्वतः माजी सैनिक आहेत, यांनी शेख कलिम यांच्याशी अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली. त्यांनी “तु अगर बॉर्डर पे होता, तो बंदूक से छन्नी कर देता” असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. ही धमकी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत देण्यात आली. विशेष म्हणजे, त्याच दिवशी दुसऱ्या एका आईसक्रिम विक्रेत्याची गाडीही जप्त करण्यात आली होती, परंतु फोनवर कोणाशी तरी बोलल्यानंतर ती गाडी त्वरित सोडण्यात आली – फक्त शेख कलिम यांचीच गाडी जप्त ठेवण्यात आली. ७ व ८ एप्रिल रोजी शेख कलिम यांनी नगरपालिकेत जाऊन हातगाडी सोडवण्यासाठी विनंती केली, दंड भरण्यासही तयारी दर्शवली. मात्र, प्रमोद जाधव यांनी स्पष्ट नकार देत, उद्धटपणे वागणूक दिली. या घटनेमुळे शेख कलिम यांचा संपूर्ण उदरनिर्वाह ठप्प झाला असून, कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या या फळविक्रेत्याला आता आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीची चिंता भेडसावत आहे. या प्रकारामुळे अतिक्रमण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेख वसीम म्हणाले, “सामान्य गरीब फळविक्रेत्यावर बेकायदेशीर कारवाई करून आर्थिकच नव्हे तर मानसिक छळ करण्यात आला आहे. प्रमोद जाधव यांनी दिलेली धमकी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून, विभागातील वरिष्ठ अधिकारीही जबाबदार आहेत. आम्ही या प्रकरणात दोषींवर कठोर फौजदारी कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करू. गरिबांच्या हक्कासाठी आम्ही ही लढाई थांबवणार नाही.”

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *