महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक – राज्यपाल बागडे

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक – राज्यपाल बागडे

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक करावे आणि छेड काढणाऱ्यांना जागच्या जागी चोप द्यावा, असे परखड मत त्यांनी मांडले. राजस्थानमधील भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, असे स्पष्ट केले.बागडे यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी समाजानेही पुढे येण्याचे आवाहन केले. “घटनेचे व्हिडीओ बनवण्यापेक्षा गुन्हेगाराला रोखणे महत्त्वाचे आहे.

जोपर्यंत छेड काढणाऱ्यांना तिथल्या तिथे धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत,” असे ते म्हणाले. आज भारतात १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी फाशीची शिक्षा आहे, तरीही अशा घटनांमध्ये घट होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. राज्यपाल बागडे यांनी एका नगर पंचायतीतील उदाहरण देत, “भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जसे नसबंदी करण्यात येते, तसेच बलात्कारी गुन्हेगारांवरही कठोर कारवाई करायला हवी,” असे मत व्यक्त केले. समाजासाठी धोका निर्माण करणाऱ्या अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाज आणि कायदा यंत्रणांनी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *