खुलताबाद : बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील महावितरणचे शाखा अभियंता मारुती काळबांडे यांची तत्काळ उचल बांगडी करून मुख्य कार्यालयात पाठवावे, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज दि २१ फेब्रुवारी रोजी महावितरणचे कार्यकारी अभियंता उस्मान खान यांची भेट घेतले आणि निवेदनात असा इशारा दिला कि कारवाई न केल्यास काळबांडे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पाडळी (ता. खुलताबाद) येथील शिवाजी जाधव यांचे रोहित्र १० फेब्रुवारी २०२५ रोजी जळाले होते. संबंधित वायरमन श्री. उंबरे यांनी ११ फेब्रुवारी रोजीच शाखा अभियंता काळबांडे यांना कळवले होते. मात्र, काळबांडे यांनी तब्बल ११ दिवस उशीर करत २० फेब्रुवारीला कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण २ कार्यालयाला रिपोर्ट पाठवला. सध्याचा रब्बी हंगाम सुरु असून पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, रोहित्राच्या दुरुस्तीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा करूनही काळबांडे यांनी दुर्लक्ष केले आहे

. त्यांच्या वागण्यात अरेरावी आणि उद्धटपणा दिसून येत आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतरही महावितरणकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून काळबांडे कार्यालयात अनुपस्थित असून, दहा-दहा दिवस ते कार्यालयात येत नसल्याचीही माहिती मिळाली आहे.काळबांडे यांच्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्या वर्तणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे काळबांडे यांची उचल बांगडी तात्काळ करून मुख्य कार्यालयात पाठवावी, अन्यथा शेतकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी भाजपचे गंगापुर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्ञानेश्वर नलावडे, प्रकाश वाकळे, परसराम बारगळ, योगेश बारगळ, अरुण आघाडे, सतीश दांडेकर, शिवाजी गायकवाड, अविनाश कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, ज्ञानेश्वर बारगळ आदी मान्यवर उपस्थित होते.