छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय (शरदचंद्र पवार)मुंबई येथे प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस रविंद्र पवार यांची शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला,शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख,शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई)शहर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तय्यब खान यांनी भेट घेऊन होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संदर्भात चर्चा केली

. यात प्रामुख्याने बुथ कमीट्या वर चर्चा करण्यात आली.त्यामध्ये बुथ कमिट्या मजबूत करणे,व बुथ कमिट्याचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची सुचना प्रदेश सरचिटणीस यांनी केले. शिवाय औरंगाबाद शहरातील भौगोलिक परिस्थिती व मध्य पुर्व विधानसभा क्षेत्रांमधीत माहिती जाणून घेतली. यावेळेस शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्यूब खान,मध्य वि.स.म.सं.अध्यक्ष मोहम्मद रजी,शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख अलीम,शहर जिल्हा सचिव शेख इफ्तेखार,फेरोज कुरेशी,जुबेर कुरैशी इत्यादी उपस्थित होते.