फुलंब्री (प्रतिनिधी हेमंत वाघ) : बैठकीला 34 जिल्ह्यातील संघटनेचे एकूण 2000 अधिकारी/कर्मचारी केडर महिला प्रतिनिधि उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन श्री. विलास झाल्टे व श्रीमती सुप्रिया साळुंके यांनी केले. श्री विलास झाल्टे यांनी सुरवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने वातावरण ऊर्जावान बनविले त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.बाबासाहेब सरोदे राज्य संघटना सचिव यांनी केले. मागील आंदोलनाची रुपरेषा श्री . नवनाथ पवार राज्य संघटना कोशाध्यक्ष यांनी मांडली…. आंदोलन सुरू केले व त्यामध्ये मागच्या झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी व इतिहास संघटनेला 100% यश आले..पुढील कृती कार्यक्रमात गाव स्तरावर कार्यक्रम करणार आहोत… गावातील शंभर टक्के महिला गावामध्ये गावाफेरी / दिंडी घेऊन गावामध्ये फेरी काढतील. यामुळे जनजागृती होईल..सरपंच व ग्रामसेवक गावातील लोकप्रतिनिधी जागे होतील… यासाठी 2011 ते 2024 पर्यंत मागण्या ह्या वारंवार संघटनेच्या मार्फत शासनाकडे याबाबत दाद मागितले आहे.. उमेद चा स्वतंत्र विभाग करावा.. व त्या अंतर्गत सर्व अधिकारी / कर्मचारी हे नियमित पदावर घेण्यात यावे या बाबत वारंवार निवेदन पत्र मा. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री… व महाराष्ट्रतील सर्व लोकप्रतिनिधी यांना देऊनही संघटनेची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.. विधानसभेत आमदार यांनी उमेद च्या मागण्या बाबत लक्षवेधी लावुनही शासनाने याची दखल घेतलेली नाही. 2 ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास येत्या 3 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्राभर 34 जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे… मागील मुंबई येथील आंदोलनामध्ये श्री.गजानन ताजने सक्रिय होतें. त्यांचें अभियानासाठी व संघटना साठी खुप मोठे योगदान आहे.. या नंतर लगेच ताजने साहेबांचे दुःखद निधन झालेले आहे.. त्यांना व इतर अनेक शहीद झालेल्या उमेद चे शिलेदारांना संघटनेच्या वतीने दोन मिनिटं उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. राज्य संघटनेच्या उपाध्यक्ष निर्मला शेलार यांनी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. व कार्यक्रम पत्रिकेचे वाचन केले.. राज्य कोषाध्यक्ष नवनाथ पवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून मार्गदर्शनास सुरुवात केली. जय उमेद जय जय उमेद या घोषनेने सुरुवात केली. उमेद संघटनेच्या माननीय माजी राज्य अध्यक्ष चेतना लाटकर व श्री डॉ बलवीर मुंडे या लोकांनी संघटना उभा करण्यासाठी प्रयत्न केले.. जी व्यक्ती समाजासाठी झटते त्यांचे नाव आज अजरामर होते. संघटनेच्या काही पदाधिकारी यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांची आज कोर्टकेस सुरू आहे… त्या मागे घेण्यात यावी…मागील सहा महिन्यांचे त्यांचे मानधनही पहिला आंदोलनात दिलेले नाही.. यापूर्वी संघटनेचे दोन मोठे आंदोलणे पार पाडली.. राज्य संघटनेचा उपाध्यक्ष निर्मला शेलार यांनी गाव स्तरावर गाव फेरीचे नियोजन करून त्यामध्ये सर्व प्रभाग संघांचे /ग्राम संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य व सर्व केडर या आंदोलनात प्रभाग फेरी च्या माध्यमातून सहभागी होणे गरजेचे आहे… तसेच पूर्वतयारी म्हणून गाव पातळीवर किती तारखेला नियोजन करणार आहे त्याची माहिती राज्य संघटनेला द्यायचे आहे.. गावातील लोकप्रतिनिधी प्रत्येक शेवटच्या लोकप्रतिनिधी पर्यंत सरपंच/ग्रामसेवक यांना देणे गरजेचे आहे.. राज्य सचिव बाबासाहेब सरोदे यांनी कृतिका कार्यक्रमात एकत्रितपणे सुसूत्रीकरण असणे गरजेचे आहे. पदाधिकारी यांचे नियोजन असावे. प्रभागांमध्ये वीस हजार महिलांचे प्रभाग फेरीमध्ये सहभाग असणे गरजेचे आहे असे सुचवले.. संघटनेचे सहसचिव संदीप दाभाडे यांनी सहा तारखेला आपल्या लोकप्रतिनिधींना राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जळगाव येथे उपस्थित राहण्या संदर्भात मार्गदर्शन केले सीएससी कर्मचाऱ्यांचे श्री नरेंद्र काकड सर यांनी संघटनेच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाचे कथन केले व प्रभाकर गावडे स्वप्निल शिर्के नवनाथ पवार बाबासाहेब सरोदे यांच्या नेतृत्वात आपण निश्चितच यशस्वी होऊ देणार आहोत असे जाहीर केले..संघटनेचे राज्य अध्यक्ष स्वप्निल शिर्के यांनी महाराष्ट्राला किंवा राज्याला जेव्हा वेदना झाल्या तेव्हा तेव्हा या ठिकाणाची आठवण झाली आहे.

. म्हणून आपण ही बैठक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ठेवली आहे असे आवर्जून सांगितले… सर्वांचे स्वागत या ठिकाणी केलेले आहे व नंतर बैठकीची सुरुवात केली..छत्रपती संभाजीनगर च्या सर्व सदस्यांचे स्वागत केले व आभार मानले सर्व जिल्हा अभियान व्यवस्थापक व तालुकास्तरावरील कर्मचारी सीएससीचे कंत्राटी कर्मचारी हे रात्रंदिवस अभियानासाठी झटत आहेत ही पद्धत शासनाच्या नियमित पदावर कर्मचारी म्हणून करून घेणे आवश्यक आहे… राजस्थानची कर्मचारी हे परमनंट झाले याबाबत संदर्भ आपण दिलेत शासनाला त्यामुळे शंभर दिवस कुत्र बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.. पुढे संघटना काय करणार आहे यासाठी ही बैठक आहे.. ते तुमच्या मनात आहे. ते आमच्याही मनात आहे… आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आपण हा कृती कार्यक्रम ठरविला हे मान्य आहे..?? याबाबत ठराव घेणार आहोत यात सर्वांनी हात वर करून सहभाग नोंदवाला. व ठराव मंजूर करण्यात आला.. ग्रामविकास मंत्री यांच्या जिल्ह्यात उमेद चे राज्य संघटनेचे शेवटचे अधिवेशन हे 5 लक्ष महिलांच्या उपस्थिती मध्ये आपण घेणार आहोत.. प्रभाग समन्वयकाच्या बदल्या ह्या होत नाही जशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रामसेवकांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होतात. प्रभाग समन्वयक यांची बदली झालेली नाही.. केडर चे प्रश्न पूर्ण झालेले नाहीत..म्हणून आपण ही राज्यस्तरीय अधिवेशन हे ग्रामविकास मंत्री महोदय यांच्या जिल्ह्यामध्ये दिनांक 06/10/24 रोजी घेणार आहोत असे सर्वानुमते ठराव घेण्यात आला.. सहा तारखेला महाराष्ट्राला इतिहास घडवायचा आहे आपल्या अधिवेशन हे 6 तारखेला 72 लाख कुटुंबांच्या शाश्वत उपजिवेकेसाठी आणि कर्मचारी केडर यांच्या साठी घेणार आहोत.. यामध्ये आपल्या पाच लाख महिला व कर्मचारी अधिकारी या अधिवेशनात उपस्थित राहणार आहे.. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय व ग्रामविकास मंत्री महोदय यांना या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित करणार आहोत.. एक जागा झालेला कुटुंब एक गाव जागा करतो एक गाव जागा झालेला कुटुंब एक जिल्हा व एक जिल्हा एक राज्य व एक राष्ट्र जागा करत असतो असं बोलून शेवटी अध्यक्ष यांनी जय उमेद या घोषणेने अध्यक्षीय भाषण थांबवले. सदरील अधिवेशन पार पडण्यास छत्रपती संभाजी नगर चे अध्यक्ष सचिन सोनवणे उपाध्यक्ष राजू सय्यद कोषध्यक्ष सुनील बारबैले व सचिव देविदास चौधर, कृष्णा बनसोडे,तसेच जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारणी व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले…