फुलंब्री प्रतिनिधी हेमंत वाघ– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब मनसे नेते दिलीप बापू धोत्रे शेतकरी नेते संतोष भाऊ नागरगोजे जिल्हा अध्यक्ष वैभवजी मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ०८/०७/२०२४ रोजी कन्नड तालुक्यातील ७१,१०० शेतकर्यांचे दावे फेटल्यामुळे पिक विमा कंपनीसह बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसह तहसील कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन सुरु करून पिकविमा कंपनी विरोधात ४ तास घोषणाबाजी करण्यात आले आणि झोपलेले प्रशासन जागी झाले त्यानंतर तहसीलदार विद्याचर कडवर साहेब, तालुका कृषि अधिकारी बाळराजें मुळीक साहेब यांनी आंदोलना ठिकाणी येऊन आंदोलनाची दाखल घेऊन दिनांक १० जुलै २०२४ पर्यंत पिकविमाची रक्कम संबंधित शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात येईल तसेच चोलामंडल पिकविमा कंपनी व बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात

असे लेखी आश्वासन तहसिलदार , कृषी अधिकारी यांनी दिले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष अनिल शेळके पाटील शहर अध्यक्ष शशांक महादाणे तालुका सचिव गोपालसिंग राजपूत तालुका संघटक शंकर मतसागर तालुका उपसंघटक सचिन शेजवळ तालुका उपाध्यक्ष अशोक पवार तालुका उपाध्यक्ष संतोष सोनावणे , तालुका उपाध्यक्ष सांडू सुरे तालुका उपाध्यक्ष अशोक जाधव शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष खेळवणे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष संदिप देवरे शेतकरी सेना तालुका सचिव योगेश पवार सर्कल अध्यक्ष शरद मोरे , सर्कल अध्यक्ष कृष्णा जाधव महाराष्ट्र सैनिक सागर निमसे , योगेश पल्ह्यटे विजय हाडोळे , अक्षय हाडोळे , प्रीतम देठे , कृष्णा अकोलकर ,संजय इंगळे , गणेश राठोड , शेषराव पवार, किसन जाधव , अनिल रमणे , रामेश्वर पवार , प्रविण पवार , किरण राठोड , निलेश चव्हाण , किरण जाधव, प्रल्हाद चव्हाण, जीवन राठोड , दादा भवर , पांडुरं चव्हाण , सचिन मोटे ,बंडू भवर , आदी पदाधिकारी उपस्थित होते .