मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही, विरोधकांना अजित पवारांचे प्रत्युत्तर
नाशिक (प्रतिनिधी) : मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही, विकासाच्या दृष्टीने कार्य करणारा मी कार्यकर्ता आहे असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार बांनी केले आहे. सुरगाणा येथे अजित पवार गटाचा भब्य शेतकरी व कृतज्ञता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते, त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबरही भाष्य केले आहे. वावेळी बोलतांना ते म्हणाले, “कळवण आणि सुरगाणा या विधानसभा मतदारसंघांत अर्थखाते माझ्याकडे असल्याने २२०० कोटींचा निधी दिला. पूर्वी सुरगाणा आणि कळवण वेगवेगळे मतदारसंघ होते. बापूर्वी जे आमदार झाले त्यांच्या कारकिर्दीत किती निधी आला आणि आता किती आला. हे मी इथले आमदार माझ्या पाठीशी राहिले म्हणून करू शकलो. आज राज्यातील महिला खुश आहे. अहमदनगरमध्ये माझे महिलांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले. इथे सुरगाणामध्येही आदिबासी महिलांनी माझे स्वागत केले. ही संस्कृती एक ठेवा आहे. तो ठेवा आपण जपला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, “आर्थिक बाबतीत माझ्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजे. यासाठी मी अर्थसंकल्प तयार करताना मुख्यमंत्री, वित्त विभागाशी चर्चा केली आणि त्यांना सांगितले की अडीच लाखांपेक्षा कमी उत्फन असलेल्या सर्व जातीमधील कुटुंबातील महिलांना मदत केली पाहिजे. किती मदत करता येईल याचा अभ्यास केला. ही योजना आणून गरीब महिलांना आम्ही सक्षम केले, जुलै पासूर योजना सुरू केली.

ऑगस्टमध्ये रक्षाबंधनापर्यंत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये
पोहोचणार आहेत. महिलांचे खाते बँकेत उघडून ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जाणार आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या खात्यात ती जाणार नाही”, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहीण ही तात्पुरती योजना असल्याचे बोलले जात आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, विरोधकांच्या पोटात दुखत आहे. निवडणूक आली म्हणून आम्ही घोषणा केली असे ते म्हणतात. शेतकयांना बीजबिल माफी दिली. महायुतीच्या कोणत्याही योजना औटघटकेच्या नाहीत. मी शब्दाचा पका आहे. हा अजितदादांचा बादा आहे. मी सहजासहजी कोणाला शब्द देत नाही, मात्र एकदा शब्द दिला की मी मागे हटत नाही”, असे म्हणत अजितदादांनी विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साथला मावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले आहे, ते म्हणाले, साधारणपणे सिटींग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पण त्यात काही जागांची अदलाबदल होणार आहे. आता एखादा सिटिंग आमदार असेल. पण त्याच्या तुलनेत कुसऱ्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाने लढवायची, असं आमचं ठरलं आहे. पण ज्या उमेदवाराला ही जागा दिली जाणार आहे, तो तुल्यबळ अप्तावा, त्याची निवडून येण्याची क्षमता असावी हे आम्ही पाहणार आहोत, याबाबतच आमच्या तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, असं अजित पवार यांनी म्हंटल आहे