महानगरपालिकेचे लाखो रुपयांचा कर बुडविणाऱ्यांना मदत करणारे समी वार्ड अधिकारी यांना निलंबित करून यांच्या विरुद्ध कर लावून कायदेशीर कारवाई कारा !

महानगरपालिकेचे लाखो रुपयांचा कर बुडविणाऱ्यांना मदत करणारे समी वार्ड अधिकारी यांना निलंबित करून यांच्या विरुद्ध कर लावून कायदेशीर कारवाई कारा !

संभाजीनगर (प्रतिनिधी), नगर भूमापन क्र. ६६१८, काळा दरवाजा येथील सय्यद काशिफउद्दीन सय्यद रईसोद्दीन यांनी चार मजली इमारत बांधलेली आहे. त्या इमारतीमध्ये एकुण १८ टु बीचके फ्लॅट आहेत. त्यामध्ये त्यांनी १६ फ्लॅट प्रतिमाह १०,०००/- रुपये भाड्याने दिले आहेत. त्यांनी महानगरपालिकेची दिशाभुल करून फक्त १८ फ्लॅटला चार ते पाच हजार रुपये कर लावून घेतलेला आहे. आम्ही माहिती घेतली असता आम्हाला असे माहीत पडले की, सय्यद काशिफउद्दीन यांचे भावजयी म्हणजे बहिणीचा नवरा नामे समी हे महानगरपालिका वार्ड नं. ९ चे वॉर्ड अधिकारी आहेत. समी साहेब यांनी महानगरपालिकेचा कर बुडविण्यामध्ये त्यांचे मेव्हणे नामे काशिफउद्दीन यांना सरळ मदत करताना दिसत आहेत. कारण समी साहेब हे स्वतः महानगरपालिकेचे कर्मचारी असून त्यांनी महानगरपालिकेच्या आयबाबत विचार करावा की, नातेवाईकांबाबत विचार करावा? हा एक प्रकारचा महानगरपालिके सोबत गद्दारी करत आहेत.


तरी मे. साहेबांना विनंती की, समी साहेब यांची कार्यालयीन चौकशी करावी की, अशा किती नातेवाईकांचा त्यांनी सत्य लपवून महानगरपालिकेच्या कराची चोरी करत आहेत. तरी मे. साहेबांना विनंती की, सदरची समी साहेबांची माहिती मनपा आयुक्त साहेबांना देण्यात यावी व सदर मालमत्ता क्रमांक ६६१८ यावर नियमाप्रमाणे कर लावून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागाणी राज्यघटना बचाव संघर्ष संघ. जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *