फुलंब्री { प्रतिनिधी हेमंत वाघ_} फुलंब्री तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत 700 विहीरी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच 1100 गोठयांचे कामे पूर्ण झालेली आहेत. संबंधित विहिरीचे व गोठे मोजमाप करणेकरीता शेतकरी मोठ्या अपेक्षेने मोजमाप पुस्तिका तयार करणाऱ्या यंत्रणेची प्रतिक्षा करत आहेत, मात्र संबंधित यंत्रणा ही प्रतिविहीर मोजमाप करणेसाठी 15 हजार रुपयांची मागणी करीत असून गोठेसाठी 10 हजार रुपयांची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतक-यांची मोठया प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत

असून शेतकरी राजा हवालदिन झाला आहे. तरी आपणास विनंती की सदर विषयी आपण वैयक्तिक तक्ष देऊन शेतकऱ्यांच्या कामाच्या मोजमाप पुस्तिका तयार करणे संदर्भात आपले स्तरावरुन संबंधित यंत्रणेस आदेशीत करावे ही विनंती सदर विषयी दखल न घेतल्यास मी सर्व लाभार्थ्यांसह 26/07/2024 पासून आमरण उपोषणास बसणार आहोत. असे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती किशोर माणिकराव पाटील बलांडे त्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन दिले आहे