मस्जिद नज़ीर रोजाबाग , बेरीबाग येथील वक्फ मालमत्तेतील गैरव्यवहारावर चौकशीची मागणी!

मस्जिद नज़ीर रोजाबाग , बेरीबाग येथील वक्फ मालमत्तेतील गैरव्यवहारावर चौकशीची मागणी!

. छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी अश्रफ कुरेशी) : १६ जानेवारी २०२५ मस्जिद नज़ीर रोज़बाग, किल्ले अर्क, औरंगाबादच्या वक्फ मालमत्तेतील गंभीर गैरव्यवहारां विरोधात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस डॉ. रियाज़ देशमुख यांनी हा अर्ज सादर केला आहे.डॉ. देशमुख यांनी आपल्या अर्जात काही गंभीर आरोप केले असून, मस्जिदच्या वक्फ मालमत्तेच्या गैरवापराचे मुद्दे मांडले आहेत. सदर मस्जिद महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात नोंदणीकृत आहे (नोंदणी क्रमांक: MSBW/ABD/३१३/२०१२). या मालमत्तेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे

.गैरव्यवहाराचे प्रमुख मुद्दे

सबलीज़ व विक्रीचे प्रकारः लीज़होल्डर्स त्यांच्या ताब्यातील प्लॉट्स अवैधपणे सबलीज़ करत असून काही प्रकरणांत प्लॉट्सलीज़बाबत अनियमितताः मुतवल्लींनी मौजे हरसुल येथील
बिरीबाग परिसरातील गट नंबर १७३ आणि १७४ या वक्फ मालमत्तेवर शेकडो प्लॉट्स पाडून ते ९९ वर्षांसाठी रजिस्टर लीज़ डीड न करता केवळ नोटरी केलेल्या बाँड पेपरवर लीज़वर दिल्याचे आढळले आहे.सबलीज़ व विक्रीचे प्रकारः लीज़होल्डर्स त्यांच्या ताब्यातील प्लॉट्स अवैधपणे सबलीज़ करत असून काही प्रकरणांत प्लॉट्स विक्रीही होत असल्याचे उघड झाले आहे. मुतवल्लींच्या दुर्लक्षाचा आरोपः या सर्व प्रकारांबाबत मुतवल्लींनी सबलीज करणारे आणि प्लॉट विक्री करणारे लोकांचे विरुद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे. अहवाल सादरीकरणाचा अभावः सन १९९५ पासून मुतवल्लींनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही, तसेच वक्फ फंड जमा केलेला नाही.डॉ. देशमुख यांची मागणी डॉ. देशमुख यांनी मुतवल्लींविरुद्ध तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील उपाययोजना सुचविल्या आहेतःतातडीने चौकशीः मुतवल्लींवर चौकशी करून त्यांना पदावरून हटवावे आणि या वक्तसंस्थेवर प्रशासक नेमावा.वक्फ मंडळाने मालमत्ता ताब्यात घ्यावीः वक्फ मालमत्तेतील रिकामी मालमत्ता वक्फ मंडळाने आपल्या ताब्यात घ्यावी..अवैध बांधकामांवर कारवाई: वक्फ मालमत्तेवरील सर्व अवैध बांधकामे पाडण्यात यावीत.कायदेशीर कारवाई: दोषी आढळणाऱ्यांचे विरुद्ध वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ५२, ५२ A आणि भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करावी.डॉ. देशमुख यांनी या प्रकरणात प्राथमिक स्वरूपात काही दस्तऐवज पुरावे म्हणून सादर केलेली आहेत बाकीचे सर्व आवश्यक पुरावे चौकशी दरम्यान सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी वक्फ मंडळाने तातडीने लक्ष घालून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.मुतवल्लींच्या कारभारामुळे वक्फ मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप गंभीर असून, वक्फ मंडळाने यावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणातील चौकशीत कोण दोषी आढळतो आणि त्यावर कायदेशीर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *