सिल्लोड,: (सिल्लोड प्रतिनिधी डॉ.सचिन साबळे) आज जिल्ह्यातील सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौ-यावर आले होते. सिल्लोडजवळ भवन येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध करत मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महीला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात जात असताना आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अक्रामक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले तरी विविध माध्यमांतून आपली मागणी आंदोलक सरकारकडे करत आहे.

रमेश काकडे, सोमीनाथ कळम, दत्तात्रय पांढरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मराठा समाज मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी जात असताना वाशीत मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यात आले. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते तरीही ते पूर्ण केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला असल्याचे आंदोलकांनी माध्यमांना सांगितले.