.जालना ; दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत निहालसिंगवाडी ता.अंबड जि.जालना येथील ग्रामपंचायत कार्यालयात सेवानिवृत्त माजी सैनिक तसेच पोलीस कर्मचारी श्री बिजूसिंग सांडूसिंग बमनाथ यांचा कुटुंबासह सेवापूर्ती व गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मान देखील त्यांना देण्यात आला. श्री बिजूसिंग सांडू सिंग बमनात हे निहालसिंगवाडी गावातून सरकारी सेवेत रूजू होणारे पहिले कर्मचारी असून त्यांनी लष्करात २० वर्ष सेवा बजावल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलात निवड झाल्याने त्यांनी येथे देखील २० वर्ष कर्तव्य पार पाडले. मागील महिन्यात ते पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असून आज रोजी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस उपस्थित सर्व ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निहालसिंगवाडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रताप काकरवाल, सदस्य रामरतन बमनात

, पुनम बमनात, लखन बमनाथ, सुखदेव बमनात, रमेश सिंगल, कैलास काकरवाल, विठ्ठल (महाराज) काकरवाल, दिलीप कवाळे, ज्ञानेश्वर गिरी, त्रिंबक बहुरे, प्रेमसिंग घुनावत, एकनाथ काळुंके,ग्रामविकास अधिकारी श्री बागुल साहेब व त्यांचा सर्व कार्यालयीन स्टाफ, मुख्याध्यापक श्री बागुल व सर्व शिक्षक वृंद तसेच त्यांचा स्टाफ, शालेय विद्यार्थी, तसेच गावातील मान्यवर हजर होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजावंदन करणे तसेच त्यांचा सेवा पूर्ती गौरव सोहळा आयोजित करणे यासाठी सरपंच प्रताप काकरवाल यांच्या कामाचे पंचक्रोशीत कौतुक होत असून भविष्यात देखील त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहो अशी सर्व ग्रामस्थांची व जनमानसांची भावना दिसून येत आहे. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी श्री बिजूसिंग बमनात यांनी त्यांच्या सेवेचे चीज/सार्थक झाले असल्याचे व ग्रामस्थांविषयी आपुलकी व अभिमान असल्याचे मनोगत व्यक्त केले.