सत्तेचा गैरवापर? शासकीय कर्मचाऱ्याची झाडांची कत्तल आणि बेकायदेशीर इमारत बांधकाम प्रकरण !

सत्तेचा गैरवापर? शासकीय कर्मचाऱ्याची झाडांची कत्तल आणि बेकायदेशीर इमारत बांधकाम प्रकरण !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : छत्रपती संभाजीनगर मधील पहाडसिंगपुरा भागातील बुद्ध लेणी परिसरातील गट क्रमांक 37 येथे शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या ब्रदर सुनील मिसाळ यांनी प्रशासनाच्या मूक संमतीने झाडांची बेकायदेशीर तोड केली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी मनपाच्या परवानगीशिवाय थेट तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. मनपा नियमानुसार या भागात २२ फूटांपेक्षा उंच इमारतीस बंदी असतानाही ही अट पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे.स्थानिक रहिवाशांमध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये या प्रकारामुळे तीव्र संताप आहे. संपूर्ण प्रकार मनपा विभागाच्या डोळ्यादेखत घडल्याचे स्पष्ट असून, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कायदे केवळ सामान्यांसाठीच आहेत का? शासकीय नोकरीतील व्यक्तींना कायद्यापेक्षा वरचढ वागण्याचा अधिकार आहे का? असा सवाल आता समाजात उपस्थित होतो आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर वृक्षतोड आणि बांधकामाचा निषेध करत, संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच बुद्ध लेणी रस्त्यालगत उभारलेली ही बेकायदेशीर तीन मजली इमारत त्वरित पाडण्यात यावी, अशीही जोरदार मागणी सुरू आहे. आता या गंभीर प्रकरणात मनपा आयुक्त काय भूमिका घेतात आणि दोषींवर ठोस कारवाई करतात की नाही, याकडे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *