: छत्रपती संभाजीनगर, : पुणे पोर्शे कार अपघाताचे प्रकरण ताजे असताना शहरातील शिवाजीनगर भागात मद्यधुंद तरुणांनी बेफाम कार चालवत धुमाकूळ घातला. भरधाव आणि अनियंत्रित या कारने रस्त्यालगत उभ्या ४ दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला. तर एका दुकानासमोर असलेले ६ टेबल व घराच्या ओट्यालाही या कारने धडक देत तोडून टाकले. शनिवारी (दि.८) रात्री साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिवाजी नगर परिसरात एकच घबराट पसरली.

दरम्यान, कारचालकासह कारमधील मद्यधुंद चार तरुणांनी कारच्या नंबर प्लेटकाढून टाकत पोबारा केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन कडून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक (एम एच २० बी वाय ९१३६) वेगाने शिवाजीनगर कडे आली. या कारने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या नंतर कार चालकाने प्रगती हार्डवेअर या दुकानासमोर साखळीने बांधून ठेवलेल्या टेबल आणि ग्रीलला जोराची धडक दिली. पुढे या कारचालकाने रोहिणी एमोरियम समोरील ३ मोपेड आणि एका दुचाकीला धडक देत चुराडा केला.
बेफाम झालेल्या कार चालकाने संचिता जेवलर्सच्या ओट्याला आणि खांबाला धडक देत दिली. या अपघाताच्या आवाजाने नागरिक घराबाहेर आले. कार बंद पडल्याने कार मधील चालक आणि तरुणांनी कारच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट तोडून पोबारा केला.